नवी दिल्ली – प्रेक्षकांनी नावाजलेल्या पंचायत या वेब सिरीजचा चौथा हंगाम 24 जून 2025 रोजी दिमाखात सुरू होत आहे. प्रेक्षकांची मागणी लक्षात घेता ठरलेल्या तारखेपेक्षा अधिक आधीच पंचायत चार ते प्रसारण सुरू होत आहे. यात फुलेरा गावातील सरपंचपदाच्या निवडणुकीची रंगत पाहायला मिळणार आहे.
अमेझॉन प्राईमवर प्रेक्षकांना ही वेब सिरीज पाहायला मिळेल. पंचायत वेब सिरीज च्या तीन भागांनी प्रेक्षकांना मोहित केले. बिहार मधील फुलेरा या गावातील कथा या मालिकेमध्ये मांडण्यात आलेली आहे. यात काम करणाऱ्या विविध पात्रांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

फुलेरा या छोट्याशा गावामध्ये पंचायत सचिव म्हणून अभिषेक त्रिपाठी (जितेंद्र कुमार) या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणाची नेमणूक होते. पाहताक्षणी त्याला हे गाव आवडत नाही त्यामुळे तो नोकरी सोडण्याचा किंवा या गावातून बदली करून घेण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र गावातील प्रधान ( रघुवीर यादव )म्हणून ओळखले जाणारे मात्र प्रधानपदी असलेल्या मंजू देवी ( नीना गुप्ता ) उपप्रधान प्रल्हाद ( फैजल मलिक ) , रिंकू ( सान्विका ) ,पंचायतचा कर्मचारी , विकास ( चंदन रॉय )इतर काही जणांच्या सहवासाने अभिषेक हळूहळू फुलेरा गावांमध्ये रुळू लागतो त्यातच त्याची ओळख तर प्रधानची मुलगी रिंकी हिच्याशी होते आणि त्या दोघांमधील मैत्रीवाढत जाते. त्याचे रूपांतर प्रेमात होते किंवा नाही हे अद्याप गुरुदत्त आहे .
पंचायत चार मध्ये प्रेक्षकांना अनेक रंजक गोष्टी पाहायला मिळतील अशी अपेक्षा आहे. अभिषेक आणि रिंकी यांचे प्रेम सफल होते का ?त्याचे लग्नात रूपांतर होते का ?अभिषेक स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होतो का ? प्रधान पदाच्या निवडणुकीत कोण जिंकणार याचीही उत्सुकता पेक्षकांना आहेच.1
पंचायत वेब सिरीज मध्ये दाखवलेल्या फुलेरा गावातील प्रधान मंजु देवी यांची निवडणूक आल्यामुळे श्रीमती क्रांती देवी यांच्या सोबत लढत होणार आहे. वेब सिरीज च्या चौथ्या हंगामात ही निवडणूक रंगणार आहे. . या वेब सिरीज चे दिग्दर्शन अक्षत विजय वर्गीय आणि दीपक कुमार मिश्रा यांनी केले आहे.