Monday, October 7, 2024
Homeबातम्यासंविधानाचा संदेश देण्यासाठी दिंडी- सोन्नर महाराज

संविधानाचा संदेश देण्यासाठी दिंडी- सोन्नर महाराज

पुणे – संविधानातील समता संदेश सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी संविधान समता दिंडीचे आयोजन केले असल्याची माहिती समता दिंडीचे आयोजक ह.भ.प. श्यामसुंदर सोन्नर महाराज यांनी दिंडीची सुरुवात होताना पुणे येथील फुले वाड्यात बोलताना दिली.

संविधान समता दिंडीचा प्रस्थान सोहळा समताभूमी, महात्मा ज्योतिराव फुले वाडा पुणे येथे सोमवार दिनांक 1 जुलै 2024 रोजी सायंकाळी सहा वाजता पार पडला. या प्रस्थान सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे मुख्य चोपदार राजाभाऊ महाराज चोपदार, प्रसिद्ध पुरोगामी कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज वाबळे, युवा कीर्तनकार सचिन महाराज पवार, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील, लेक लाडकी अभियानाच्या प्रमुख वर्षा देशपांडे, दिंडी चालक श्यामसुंदर महाराज सोन्नर, कैकाडी महाराज मठाचे प्रमुख भारत महाराज जाधव, एक दिवस वारीचे प्रवर्तक शरद कदम, विशाल विमल, सुमित प्रतिभा संजय, दीपक देवरे, सरस्वती शिंदे, साधना शिंदे, दत्ता पाकिरे आदी उपस्थित होते. तसेच विविध संघटनांचे कार्यकर्ते पदाधिकारी, वारकरी आणि तरुणाई उपस्थित होती. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. उपस्थित सर्व पाहुण्यांनी मनोगत व्यक्त केले. पुण्यातून संविधान समता दिंडी संत तुकाराम महाराज पालखी सोबत प्रस्थान होणार आहे.

जगद्गुरु तुकोबारायांच्या पालखी सोबत ‘ संविधान समता दिंडी ‘ पंढरपूर पर्यंत जाईल. हभप शामसुंदर महाराज सोन्नर यांच्या नेतृत्वाखाली ही दिंडी पंढरपूर पर्यंत पायी वाटचाल करणार आहे.संविधानातील मूल्ये आणि संत विचारांची सांगड घालत दररोज कीर्तन,प्रवचनाच्या माध्यमातून प्रत्येक दिंडीत जाऊन सोन्नर महाराज संविधान उलगडून सांगणार आहेत.या उपक्रमाचे हे सहावे वर्ष आहे.

महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. उपस्थित सर्व पाहुण्यांनी मनोगत व्यक्त केले. पुण्यातून संविधान समता दिंडी संत तुकाराम महाराज पालखी सोबत प्रस्थान होणार आहे. सहभागी होण्यासाठी सुमित प्रतिभा संजय : 70208 60942 यांच्याशी संपर्क करावा.

फुले वाड्यावर महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते आले होतेच.पण वारकरी संप्रदायातील अनेक दिग्गज मंडळी समता भूमीत उपस्थित होती.संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे मुख्य चोपदार हभप राजाभाऊ महाराज चोपदार,पंढरपूर येथील कैकाडी महाराज मठाचे प्रमुख भारत महाराज जाधव, युवा कीर्तनकार हभप सचिन महाराज पवार,हभप ज्ञानेश्वर महाराज वाबळे या दिग्गज मंडळींची उपस्थिती होती. लेक लाडकी अभियानाच्या ॲड. वर्षा देशपांडे, अनिसचे अविनाश पाटील आदी मंडळी फुले वाड्यात उपस्थित होती.

याशिवाय सचिन नाचणेकर, ॲड.शैला जाधव,कैलास जाधव, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष माधव बावगे, साधना शिंदे,दत्ता पकिरे,अमोल भडामे, हभप समाधान महाराज देशमुख,विशाल विमल, सुमित प्रतिभा संजय, दीपक देवरे, सरस्वती शिंदे, अनेक वारकरी आणि तरुण मुलामुलींचा सहभाग मोठ्या संख्येने होता.महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

संविधानप्रेमी आणि परिवर्तनवादी समविचारी नागरिकांनी शक्य तिथे या दिंडीत सहभागी होऊन या सोहळ्याचा आनंद घेत संविधानाच्या प्रबोधन मोहिमेत सहभागी व्हावं, असे आवाहन ह.भ.प. श्यामसुंदर सोन्नर महाराज यांनी केले.

अधिक माहितीसाठी ह.भ.प. शामसुंदर महराज सोन्नर – 9892673047, शरद कदम- 9224576702, विशाल विमल – 7276559318, दत्ता पाकीरे – 8888185085 यंच्याशी संपर्क साधावा असे आवाहन्‍ करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments