कीव – युद्धाचा परिणाम केवळ मानव, अर्थव्यवस्था किंवा राजकारणापुरता मर्यादित राहिलेला नाही; तो पर्यावरण आणि जैवविविधतेवरही खोलवर परिणाम करतो आहे . युक्रेनमध्ये पक्ष्यांनी ड्रोनच्या फायबर ऑप्टिक चा वापर केल्याचे दिसून आले आहे .
युक्रेनच्या परिसरात संशोधकांना अशी पक्ष्यांची घरटी आढळल आहेत, जी हल्ला करणाऱ्या ड्रोनना मार्गदर्शन करण्यासाठी पूर्वी वापरल्या गेलेल्या फायबर-ऑप्टिक केबल्सपासून विणलेली आहेत.
झाडे, शेतजमिनी आणि इमारतींच्या छतांवर विखुरलेल्या या अतिशय बारीक केबल्स आता त्या परिसराच्या नैसर्गिक दृश्याचा भाग बनल्या आहेत आणि पक्ष्यांनी त्यांचा वापर घरटी बांधण्यासाठी सुरू केला आहे. ।
कीव येथील युद्ध संग्रहालयातील संशोधकांच्या मते, ही घरटी युद्धामुळे नैसर्गिक पर्यावरणात होत असलेल्या बदलांचे प्रभावी प्रतीक आहेत. संग्रहालयातील वरिष्ठ संशोधक याना ह्रिन्को यांच्या म्हणण्यानुसार, “फायबर-ऑप्टिक तुकड्यांनी बनलेली पक्ष्यांची घरटी युद्धाच्या स्वरूपात होत असलेल्या बदलांचे स्पष्ट उदाहरण आहेत.”गवत आणि आधुनिक युद्धातील फायबर ऑप्टिक्स पासून तयार झालेले हे छोटेसे घरटे हे दाखवून देते की, युद्धाच्या कठोर वास्तवाशी केवळ माणसेच नव्हे, तर वन्यजीवही स्वतःला जुळवून घेत आहेत.

