Thursday, July 9, 2026
Homeशिक्षणबातम्याआठवड्यात उजनी धरणातील पाणी वजा २७ वरून अधिक ३८ टक्के

आठवड्यात उजनी धरणातील पाणी वजा २७ वरून अधिक ३८ टक्के

सोलापूर – सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उजनी धरणातील पाणी पातळी वजा २७ वरून अधिक ३८ टक्के झाल्याचे दिलासादायक वृत्त आहे .

सोलापूर जिल्ह्यात अद्याप पावसाची प्रतीक्षा असली तरी पुणे भागात आणि उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील सहा दिवसात झालेल्या पावसामुळे उजनी धरणाचे चित्र बदलले आहे . ३ जुलै २०२६ रोजी उजनी धरणात वजा २७ टक्के पाणी होते .जून पूर्ण कोरडा जाऊन जुलै महिना सुरू ‘ तरीही सोलापूर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडला नाही .त्यामुळे नागरिक शेतकरी उद्योजक यासह सर्वजण चिंताग्रस्त होते .मात्र पुणे जिल्हयात व उजनी धरण धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या भरपूर पावसामुळे उजनी धरणातील पाणी झपाट्याने वाढत गेले . ९ जुलै रोजी उजनी धरणात अधिक ३८ टक्के पाणीसाठा आहे .

पुणे जिल्ह्यातील खडकवासला व इतर काही धरणे भरल्याने अद्यापही उजनी धरणात जवळपास ६० हजार क्युसेक्स पेक्षा अधिक पाण्याचा प्रवाह येतो आहे . येत्या दोन – तीन दिवसात उजनी धरण ५० टक्के भरेल असे आशादायक चित्र आहे . उ

उजनी धरणातील पाणी पातळीत होत असलेली समाधानकारक वाढ पाहून सोलापूर जिल्हयातील नागरिक, शेतकरी आणि उद्योजक यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत .

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments