Thursday, May 21, 2026
Homeशिक्षणबातम्याशिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी प्रा .राजनिश कामत

शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी प्रा .राजनिश कामत

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी प्रा. डॉ. राजनीश कमलाकर कामत यांची निवड आज गुरुवारी जाहीर करण्यात आली. महाराष्ट्राचे राज्यपाल तथा शिवाजी विद्यापीठाचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी ही घोषणा केली. आदेशाची प्रत सायंकाळी विद्यापीठ कार्यालयास प्राप्त झाली.

डॉ. राजनीश कामत हे शिवाजी विद्यापीठाचे १४ वे कुलगुरु ठरले आहेत. डॉ. दिगंबर शिर्के यांच्यानंतर सलग दुसऱ्यांदा शिवाजी विद्यापीठातील प्राध्यापकाकडेच कुलगुरू पदाचा पदभार आलेला आहे. डॉ. कामत हे शिवाजी विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक्स अधिविभागाचे माजी प्रमुख असून विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. सध्या ते मुंबई येथील डॉ. होमी भाभा समूह विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्याकडे लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचाही अतिरिक्त कार्यभार आहे. प्रा . कामत यांनी सहा महिन्यांच्या कालावधीसाठी सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू म्हणून कार्यकरून कमी कालावधीत चांगला ठसा उमटविला .

शिवाजी विद्यापीठाचे या आधीचे कुलगुरू डॉ डी.टी.शिर्के यांचा कार्यकाल संपल्याने सध्या डॉ.सुरेश गोसावी हे प्रभारी म्हणून काम पाहत होते. कुलगुरू पदासाठी अंतिम मुलाखतीला पाच जणांना बोलवले होते. त्यामध्ये प्रकुलगुरू डॉ.ज्योती जाधव यांचाही समावेश होता. त्यामुळे त्यांचेही नाव चर्चेत होते पण डॉ.कामत यांना संधी मिळाली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments