नवी दिल्ली – नवी दिल्ली येथील जामिया मिलिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सुरू केलेले आंदोलन मिटले असे वाटत असतानाच विद्यार्थी संसदेच्या निवडणुकीचे वेळापत्रक जारी करण्याच्या मागणीसाठी पुन्हा आंदोलन सुरू आले आहे .
विद्यार्थी संसद निवडणुकीसाठी एका मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची आणि विद्यार्थी संसदेच्या निवडणुका जलद गतीने घेण्याची मागणी विद्यार्थी करीत आहेत. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी ‘दिल्ली पोलीस, परत जा’ अशा घोषणा दिल्या, त्यानंतर काही विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले.
दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाने सुमारे दोन दशकांच्या खंडानंतर पुन्हा विद्यार्थी युनियनच्या निवडणुका घेण्याची घोषणा केली. मात्र, या घोषणेनंतर काही तासांतच सोमवारी कॅम्पसमध्ये पुन्हा निदर्शने सुरू झाली. विद्यार्थी एका निश्चित कालमर्यादेत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची आणि मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची मागणी करत आहेत.
दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामिया (JMI) विद्यापीठाने सोमवारी विद्यार्थी युनियनच्या निवडणुका घेण्यास सहमती दर्शवली होती. युनियनच्या राज्यघटनेला (संविधानाला) अधिकृत मंजुरी मिळाल्यानंतर या निवडणुका घेतल्या जातील. या निर्णयामुळे दोन आठवड्यांपासून सुरू असलेले विद्यार्थ्यांचे आंदोलन संपुष्टात आले आहे असे वाटत होते . रविवारी रात्री विद्यापीठ प्रशासन आणि आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींमध्ये झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला होता .
कुलसचिव कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशात म्हटले होते की, “जामिया मिलिया इस्लामिया विद्यार्थी युनियनची निवडणूक, युनियनच्या राज्यघटनेला मंजुरी मिळाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांनी घेतली जाईल.” मात्र, या आदेशात राज्यघटना तयार करण्यासाठी कोणतीही निश्चित कालमर्यादा देण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पुन्हा आंदोलन सुरू केले आहे .
तत्पू सोमवारी सुमारे १०० विद्यार्थिनी विविध प्रवेशद्वारांतून कॅम्पसमध्ये दाखल झाल्या. काही विद्यार्थिनी गेट क्र. ७ बाहेर जमा झाल्या होत्या, तर दिल्ली पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले. जामिया मिलिया इस्लामिया स्टुडंट्स युनियन (JMISU) पुन्हा सुरू करण्याच्या मागणीवरून तणाव कायम होता; विशेष म्हणजे, येथे २००६ पासून विद्यार्थी युनियनच्या निवडणुका झालेल्या नाहीत.

