नवी दिल्ली – दिल्ली युनिव्हर्सिटी स्टुडंट्स युनियन’ ( डीयूएसयू) निवडणुकीसाठी आज, १८ सप्टेंबर रोजी मतदान झाले. दिल्ली उच्च न्यायालयाने निकालांनंतर विजय मिरवणुका काढण्यावर तसेच ढोल-ताशे आणि इतर प्रकारच्या जल्लोषावर बंदी घातली आहे.
दिल्ली विद्यापीठाच्या निवडणुकीसाठी दिवस सत्रातील (डे-कॉलेज) विद्यार्थ्यांनी १८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ८:३० ते दुपारी १ या वेळेत मतदान केले, तर सायंकाळच्या सत्रातील (इव्हनिंग-कॉलेज) विद्यार्थी दुपारी ३ ते सायंकाळी ७:३० या वेळेत मतदान केले .
प्रचारादरम्यान झालेली हिंसा आणि हुल्लडबाजी यांसारख्या घटना घडल्या . , या पार्श्वभूमीवर दिल्ली उच्च न्यायालयाने निकालांनंतर विजयी मिरवणुका काढण्यावर तसेच ढोल-ताशे आणि इतर प्रकारच्या जल्लोषावर बंदी घातली आहे. त्याचबरोबर, प्रचारादरम्यान दिसलेल्या वाहनांच्या मोठ्या ताफ्यांबाबत आणि नंबर प्लेट नसलेल्या गाड्यांबाबत न्यायालयाने पोलिसांकडे विचारणा केली आहे. दिल्ली विद्यापीठ निवडणुकीदरम्यान झालेली हिंसा, हुल्लडबाजी आणि नियमांचे उल्लंघन या प्रकरणावर सर्व संबंधित पक्षांना दोन आठवड्यांच्या आत आपली बाजू मांडण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाने या प्रकरणाच्या पुढील सुनावणीसाठी ६ नोव्हेंबर ही तारीख निश्चित केली आहे.
उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा स्पष्ट केले की, लिंगडोह समितीच्या शिफारशींचे किंवा वेळोवेळी जारी केलेल्या आदेशांचे उल्लंघन होणार नाही, याची खात्री करण्यासाठी दिल्ली विद्यापीठ आणि इतर संबंधित प्राधिकरणांनी सर्व आवश्यक पावले उचलली पाहिजेत. तसेच, सार्वजनिक मालमत्तेचे कोणतेही नुकसान होणार नाही याची दक्षताही संबंधित प्राधिकरणांनी (ज्यामध्ये एमसीडीचाही समावेश आहे) घेतली पाहिजे; उल्लंघन आढळल्यास संबंधित यंत्रणेने त्वरित कारवाई करावी. लिंगडोह समितीच्या शिफारशींनुसार एक महत्त्वाची बाब असलेल्या ‘भिंती विद्रूप करण्याच्या’ प्रकारांबाबत न्यायालयाने नमूद केले की, यावर्षी अशा घटना घडलेल्या नाहीत.
अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि सह-सचिव या चार मुख्य पदांसाठी एकूण २० उमेदवार निवडणूक लढवत आहेत. मतमोजणी आणि निकालांची घोषणा १९ सप्टेंबर रोजी होणार आहे.
या निवडणुकीत ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषद’ (अभाविप) आणि ‘नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया’ ( एनएसयूआय) यांचे पूर्ण पॅनेल रिंगणात आहेत, तर ‘ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन’ (एआयएसए) आणि ‘स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया’ (एस एफआय) यांनी युती करून निवडणूक लढवली आहे.
अध्यक्षपदासाठी अभाविप ने यश डबास यांना, तर एनएसयूआय ने विजय शंकर मीना यांना उमेदवारी दिली आहे. एआयएसए – एसएफ आय चे अध्यक्षपदाचे उमेदवार अनन्या रतुरी आहेत. अध्यक्षपदाचे इतर उमेदवार अश्मित पवार, एजाज मन्सूरी, समर्थ बेनीवाल आणि समीर कुमार हे आहेत.
सचिवपदाच्या लढतीत रिया छावडी (ABVP), नम्रता चौधरी (NSUI), स्टँझिन डेस्क्योंग (AISA-SFI) आणि पंकज कुमार यांचा समावेश आहे.
सह-सचिवपदासाठी लक्ष्य राज सिंग (ABVP), गोपाल चौधरी (NSUI), बी. पारिजात (AISA-SFI) आणि विशेष यादव हे रिंगणात आहेत. दिवससत्रातील (डे-कॉलेज) विद्यार्थ्यांसाठी मतदानाची वेळ सकाळी ८:३० ते दुपारी १ अशी निश्चित करण्यात आली आहे, तर सायंकाळच्या सत्रातील विद्यार्थी दुपारी ३ ते सायंकाळी ७:३० या वेळेत मतदान करू शकतील.
DUSU न

