रायगड – टोरंट पॉवरच्या विद्युत प्रकल्यासाठी भीमाशंकर नजीकची सायखेडा परिसरातील ६०० एकर वनजमीन देऊन त्यातील हजारो झाडे तोडण्याच्या परवानगीवरून वादंग निर्माण झाला आहे . या प्रकल्पामुळे होणाऱ्या पर्यावरणीय हानीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप सरकारवर केला जात आहे .
महाराष्ट्रातील निसर्गरम्य रायगड जिल्ह्यात ३,००० मेगावॅट क्षमतेच्या ‘पंपड स्टोरेज’ (जलविद्युत साठवणूक) प्रकल्पासाठी ३२ हजार ४९० झाडे तोडण्याच्या योजनेवरून राजकीय आणि पर्यावरणीय वाद निर्माण झाला आहे. राज्य सरकार या प्रकल्पाला राज्याच्या भविष्यातील ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानत असताना, विरोधी पक्षांनी मात्र या प्रकल्पाच्या पर्यावरणीय किमतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.कर्जत तालुक्यातील ‘सैडोंगर १ कर्जत ऑफ-स्ट्रीम ओपन लूप पंपड स्टोरेज’ हा ३,००० मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प, राज्यासह इतर क्षेत्रांमधील ग्रीडची विश्वासार्हता आणि ऊर्जा सुरक्षा बळकट करण्यास मदत करेल, अशी अपेक्षा आहे.हा प्रकल्प सह्याद्री-पश्चिम घाट रांगांमधील पुणे जिल्ह्यातील ‘भीमाशंकर वन्यजीव अभयारण्या’च्या अगदी जवळ स्थित आहे.
टॉरेंट पॉवरच्या या प्रकल्पात १३,५०५ कोटी रुपयांची गुंतवणूक समाविष्ट आहे.काँग्रेस, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (यूबीटी) आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) यांचा समावेश असलेल्या विरोधी ‘महाविकास आघाडी’ने, जंगल नष्ट केल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप-युती सरकारवर जोरदार टीका केली आहे.
राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मनसेनेही सत्ताधारी सरकारवर कडक शब्दांत टीका केली आहे.मनसेने म्हटले आहे की, “गुजरातमध्ये मुख्यालय असलेल्या ‘टॉरेंट ग्रुप’च्या ३,००० मेगावॅट क्षमतेच्या जलविद्युत प्रकल्पासाठी रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील ‘साईडोंगर’ भागात वृक्षतोड सुरू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. सुमारे १३,५०० कोटी रुपयांच्या या ‘पंपड स्टोरेज’ जलविद्युत प्रकल्पासाठी तब्बल ३७७ हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे, ज्यापैकी २३३ हेक्टर जमीन ही वनक्षेत्र आहे!”
आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात मृटले आहे की कर्जत तालुक्यात गुजरातच्या ‘टोरंट पॉवर’ कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पासाठी हजारो झाडांची बेसुमार कत्तल राजरोसपणे सुरू आहे. ‘सायडोंगर’ परिसरातील समृद्ध निसर्ग संपवून, स्थानिकांच्या आणि पर्यावरणप्रेमींच्या विरोधाला पायदळी तुडवून ही कत्तल सुरू आहे . स्थानिकांचा आणि संपूर्ण महाराष्ट्राचा तीव्र विरोध असताना ह्या बेसुमार वृक्षतोडीची परवानगी वन विभागाने नेमकी कोणाच्या दबावाखाली दिली?महाराष्ट्राचा निसर्ग ओरबाडून खाजगी कंपन्यांचे खिसे भरण्याचा हा अजेंडा कधी थांबणार? नोव्हेंबरला होणाऱ्या भूमिपूजनाच्या घाईकरिता, महाराष्ट्राच्या पर्यावरणाचा बळी का दिला जातोय? असे प्रश्न आदित्य ठाकरे यांनी विचारले आहेत . भाजप जंगल तोडून महाराष्ट्राचे वाळवंट करीत असल्याचाही आरोप त्यांनी केला .
अ

